Advertisement

घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक
SHARES

बीएमसीने जाहीर केले आहे की, यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अनिवार्य असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत.

यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविधस्तरीय कार्यवाही करित आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून सन 2023 च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी चार फूट पर्यंत उंची असणाऱ्या मुर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन  पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देतानाच यासाठी योग्य जागा शोधण्याचे आणि निर्धारित करण्याचे निर्देश परिमंडळीय सह आयुक्तांना आणि उपायुक्तांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. हेही वाचा

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी आणि डिपॉझिट फी माफ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा