Advertisement

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी आणि डिपॉझिट फी माफ

महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी आणि डिपॉझिट फी माफ
SHARES

गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

तसेच गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क आणि अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील सात दिवसांच्या आत परत देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने हा निर्णय घेतल्याचं पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा