Advertisement

'दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या' वारकऱ्यांची मागणी

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात.

'दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या' वारकऱ्यांची मागणी
SHARES

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. अशा भाविकांना विठूरायाचा लाडूचा प्रसाद मोफत द्यावा,अशी मागणी वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी विठ्ठल मंदिर समितीला केली. 

या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

रामकृष्ण महाराज वीर यांनी सांगितले की, ‘ठेकेदार संस्थेकडून मंदिर समिती 12 रुपये 50 पैशांना लाडू घेऊन भाविकांना 20 रुपयांना विकत आहे. यामुळे मंदिर समितीच्या तिजोरीत जवळपास वर्षभरात कोट्यवधी रुपये जमा होत आहेत. या आषाढीपूर्वी मंदिर समितीने दर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा.

वारकरींच्या मागणीवर मंदिर समिती विचार करणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत लाडूचा प्रसाद देण्यास आमची काहीच अडचण नसल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी म्हटले आहे. मात्र ही सेवा कधी सुरू करणार यासंदर्भात कुठलाच खुलासा केला नाही. हेही वाचा

घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक

शिर्डीला जाताय? साई बाबा मंदिरातील नवीन नियम जाणून घ्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा