Advertisement

शिर्डीला जाताय? साई बाबा मंदिरातील नवीन नियम जाणून घ्या

शिर्डीतील साईंच्या नगरीमध्ये दररोज देश विदेशातील हजारो साई भक्त साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात.

शिर्डीला जाताय? साई बाबा मंदिरातील नवीन नियम जाणून घ्या
SHARES

शिर्डीतील साईंच्या नगरीमध्ये दररोज देश विदेशातील हजारो साई भक्त साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षारक्षक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल, बूट घालून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

साई बाबा संस्थानच्या वतीने साई मंदिर परिसरात चप्पल बूट घालून प्रवेश करण्यावर बंदीचे नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले. या नियमाची अंमलबजावणी आज १२ मे पासून सुरू करण्यात येत आहे.

साईबाबा संस्थानचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा शंकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रशासकिय अधिकारी, अधिक्षक सर्व विभागाचे विभागप्रमुख कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करतांना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश करावा.

तसेच संरक्षण विभागाने साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना साईंच्या समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देतांना पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश द्यावा. सदर परिपत्रकाची कार्यवाही दिनांक १२/०५/२०२३ पासून तात्काळ करण्यात यावी असे, नमूद करण्यात आले आहे.



हेही वाचा

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खुशखबर! मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय

शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, ग्रामस्थांचा निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा