Advertisement

शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, ग्रामस्थांचा निर्णय

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, ग्रामस्थांचा निर्णय
SHARES

महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मेपासून साईबाबांच्या शिर्डीत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचं अनेकदा समोर आलं. त्यानंतर मंदिराला दुहेरी सुरक्षा पुरवण्यात आली. साई मंदिरात प्रस्तावित CISF सुरक्षेला ग्रामस्थांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आज विखे पाटलांची भेट घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचवणार आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या?

  • साईबाबा मंदीराला CISF सुरक्षा व्यवस्था नको असून आहे तीच सुरक्षा योग्य
  • साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकाऱ्यांकडे नको हे पद रद्द करून उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्याकडे असावे.
  • साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी
  • शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात यावी. यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे



हेही वाचा

पर्यटन स्थळांच्या यादीत कान्हेरी लेणी, वज्रेश्वरी मंदीराचा समावेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा