Advertisement

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खुशखबर! मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय

साई संस्थान समितीने आता ही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खुशखबर! मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय
SHARES

महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात आता भाविकांना हार, फुले आणि प्रसाद घेता येणार आहे. साई संस्थान समितीने आता ही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता साई संस्थानच्या माध्यमातून भाविकांना माफक दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. ही फुले शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिर परिसरात भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साईभक्तांची होणारी ही लूट थांबणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे.

साई संस्थान आता कोरोनाच्या काळात घातलेली बंदी उठवणार आहे. कोरोनाच्या काळात संस्थेने साईबाबांना फुले, हार आणि नैवेद्य दाखवण्यास बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात शिर्डीच्या साई मंदिरात फुले, प्रसाद नेण्यास बंदी घातल्याने भाविक आणि दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही बंदी उठवण्याची मागणी भाविक व दुकानदारांकडून शिर्डी संस्थानकडे सातत्याने होत आहे.

शिर्डीच्या काही ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी बळजबरीने साईबाबा मंदिरात हार आणि फुले नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

कोरोनाच्या काळात साई मंदिरात हार, फुले आणि नैवेद्य वाहण्यास बंदी होती. त्यामुळे आर्थिक नुकसानाबरोबरच दुकानदार व शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. शेतात फुले सडत होती आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजाही वाढत होता. शिर्डी परिसरात सुमारे 500 शेतकरी फुलांची लागवड करतात. शिर्डीत दररोज लाखो रुपयांच्या फुलांची उलाढाल होते.हेही वाचा

शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, ग्रामस्थांचा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा