Google Pay अॅपमधून आता चेहरा दाखवून करा पैसे ट्रान्सफर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

UPI पेमेंट करण्यासाठी वापरलं जाणारं Google Pay या अ‍ॅपमधून पैस ट्रान्सफर करणं आणखीनचं सोपं झालं आहे. कारण या अ‍ॅपमध्ये कंपनीनं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर दिलं असून याद्वारे आता कोणतेही डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांना बायोमॅट्रिक सुरक्षा पद्धतीचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.

गुगल पेच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना युजर्सना ४ अंकी पिन टाकावा लागत होता. पण, आता नव्या फीचरमुळं युजर्सकडं फिंगरप्रिंट आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. हे नवं फीचर PIN पेक्षा अधिक जलदगतीनं काम करत आहे. युजरला हा नवा पर्याय अॅपमधील Sending Money या श्रेणीच्या खाली सापडणार आहे.

बायोमॅट्रिक सिक्युरिटी फीचर केवळ पैसे ट्रान्सफर करण्यासाठीच देण्यात आलं आहे. अँड्रॉइड १० चा सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनमध्येच सध्या हे फीचर कार्यान्वित असणार आहे. परंतु, लवकरच अँड्रॉइड ९ साठीही या फीचरचं अपडेट दिलं जाणार असल्याची माहिती मिळते.


हेही वाचा -

केंद्र शासित प्रदेशाचे पहिले मराठी पोलिस प्रमुख

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या