केंद्र शासित प्रदेशाचे पहिले मराठी पोलिस प्रमुख

मूळचे अमरावतीच्या धामणगाव येथील जळका पटाचे आहेत. धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बीईचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून केलं.

केंद्र शासित प्रदेशाचे पहिले मराठी पोलिस प्रमुख
SHARES

केंद्राने जाहिर केल्यानंतर गुरूवारपासून लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहिर करण्यात आले. या लडाखमध्ये कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी. या उद्देशाने तेथील पोलिस प्रमुखपदाची धुरा ही अमरावतीचे आयपीएस अधिकारी सतीश खंदारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खंदारे हे १९९५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. लडाखच्या पोलिसप्रमुखपदी पहिली मराठी व्यक्ती नियुक्त झाल्याने महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी असलेले सतीष खंदारे हे   १९९५ मध्ये  सतीश खंदारे हे आयपीएस अधिकारी झाले. रँकनुसार त्यांना जम्मू काश्मिर केडरमध्ये दाखल करण्यात आले. जम्मू काश्मिरमधील श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यांत जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्रात त्यांनी २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलिस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक, नवी मुंबई भागातील खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागात पोलिस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा