महाराष्ट्रात लोडशेडिंगची समस्या दूर होणार, 'हा' आहे सरकारचा मास्टर प्लॅन

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

मे महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे. याचं कारण म्हणजे विजेची वाढलेली मागणी आणि मागणीनुसार अपुरा कोळसा. पण लवकरच ही समस्या दूर होणार आहे.

सरकारी वीज निर्मिती युटिलिटीनं परदेशातून कोळसा आयात केल्यानंतर हे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करणार असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यामुळे कमी होत चाललेल्या कोळशाच्या साठ्यात भर पडेल आणि औष्णिक ऊर्जा केंद्रांवर उत्पादन वाढेल.

वाढत्या उष्णतेमुळे आणि औद्योगिक आणि कृषी ग्राहकांच्या वापरामुळे विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) सुमारे २,५०० MW ते ३,००० MW च्या तफावतीला सामोरे जात आहे.

राज्यातील विजेची मागणी २८,००० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, महाजेनकोनं २० लाख टन कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सुमारे ५% ते १०% देशांतर्गत कोळशाचे मिश्रण केलं जाईल.

वीज वितरण युटिलिटीनं राज्यभर लोडशेडिंग किंवा वीज कपात सुरू केली आहे. त्यामुळे, महाजेनको सहसा संकट टाळण्यासाठी पुरवठ्यातील कमतरता भरून काढण्यासाठी कोळशाची आयात करते. २०२० मध्ये शेवटचा कोळसा आयात केला होता. कोराडी, नाशिक, भुसावळ, परळी, पारस, चंद्रपूर आणि खापरखेडा येथे सात औष्णिक वीज केंद्रे आहेत.


हेही वाचा

CNG, PNG आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा वाढले

पुढील बातमी
इतर बातम्या