Advertisement

CNG, PNG आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा वाढले

मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरांनी भडका उडाला आहे.

CNG, PNG आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा वाढले
SHARES

मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरांनी भडका उडाला आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी महागलं आहे. सीएनजीच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे.

तर सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पाईप्ड कुकिंग गॅसच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. पाईप्ड कुकिंग गॅस ४१ रुपये प्रति किलो झाला आहे.

राज्य सरकारनं वॅट कमी केला होता. त्यामुळे सीएनजीचे दर कमी होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडनं दर वाढवल्याने सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासाही आता नाहीसा झाला आहे.

महानगर गॅस लिमिडेटच्या निवेदनात नमूद केलं आहे की, "ग्राहक-केंद्रित कंपनी असल्यानं आम्ही ८ लाखांहून अधिक CNG आणि १८ लाखांहून अधिक घरगुती पाईप्ड गॅस ग्राहकांसाठी किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यानं आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला."

राज्य सरकारनं सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांनी कमी केला होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना वॅट कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यानंतर अधिसूचनाही जारी झाली होती.

१ एप्रिलपासून बदललेले नवीन दर लागू झाले होते. यामुळे महाराष्ट्रात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो साडेतीन रुपये स्वस्त झाला होता. परंतु वॅट कमी केल्याचा फायदा सामान्य मुंबईकरांना फार दिवस मिळाला नाही.

पाच दिवसानंतर सीएनजी प्रति किलो सात रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो पाच रुपयांनी महागला आहे. महानगर गॅस लिमिटेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.



हेही वाचा

हॉटेलमधील जेवण महागणार, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

मुंबईत एसी भाडेतत्वावर; महिन्याला भरा ‘इतके’ भाडे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा