Advertisement

मुंबईत एसी भाडेतत्वावर; महिन्याला भरा ‘इतके’ भाडे

सर्वसमान्यांनाही एसची थंडगार हवा घरबसल्या घेता येणार आहे. कारण आता एसी भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे.

मुंबईत एसी भाडेतत्वावर; महिन्याला भरा ‘इतके’ भाडे
SHARES

दरवर्षी उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं अनेकजण थंडगार हवेसाठी एअर कंडिशनरची (एसी) खरेदी करतात. मात्र, अनेकांना एसी खरेदी करण कठीण जातं. त्यामुळं ते पंख्याचा वापर करतात. परंतू आता या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता सर्वसमान्यांनाही एसची थंडगार हवा घरबसल्या घेता येणार आहे. कारण आता एसी भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे.

सर्वसमान्य नागरिक आपल्या घरी भाडेस्वरुपात एसी लावू शकणार आहेत. ‘भाडेतत्त्वावर एसी’ ही अनोखी सुविधा मुंबईत उपलब्ध झाली आहे. त्यामुळं सर्वसमान्यांनाही गारेगार हवेची मजा घेता येणार आहे.

एसी भाड्याने घेता येणारी सोय ऑनलाइन उपलब्ध आहे. विविध अॅप्स किंवा वेबसाइटवर सर्व माहिती भरून मासिक तत्त्वावर १ किंवा १.५० टन क्षमतेचा एसी भाड्याने घेता येत आहे. एसी भाडेतत्वावर घेण्यासाठी सरासरी १६०० रुपये मासिक भाडे आकारले जात आहे.

१ टन एसीचे भाडे साधारण मासिक १३०० ते १५०० रुपये तर १.५० टन एसीचे भाडे मासिक १७०० ते २००० रुपये आहे. यासाठी ग्राहकांना जवळपास २००० रुपये ठेव म्हणून द्यावे लागत आहेत. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांचा विचार केल्यास हे भाडे परवडणारे ठरते.

दरम्यान, भाडेतत्वावरील एसीची अनोखी संकल्पना सर्वसमान्यांना परवडणारी असल्यानं या एसीची मागणी प्रचंड वाढली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा