'त्या' दोघींची अनोखी प्रेमकहाणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

म्हणतात ना प्रेमात जात... पंथ.. वय.. रंग आणि काही केसेस मध्ये लिंग सुद्धा मॅटर करत नाहीत.. तर प्रेमात पडलेल्यांना प्रेमाची केवळ एकच डेफिनिशन माहिती असते आणि ती म्हणजे प्रेम आणि केवळ प्रेम... याचेच उदाहरण म्हणजे नागपूरची डाँक्टर सुरभी मित्रा आणि कोलकाताची पारोमिता मुखर्जी या दोघी मैत्रिणींची प्रेमकहाणी...

नागपुरात डॉक्टर सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघींची ही गोष्ट आहे. लवकरच त्या सिविल सेरेमनी म्हणजेच लग्नही करणार आहेत. एकमेकींच्या प्रेमाचा स्वीकार करून ते वास्तव इतरांनाही स्वीकारायला लावणाऱ्या, आणि पुढे कायद्याचं आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवणाऱ्या या दोन उच्चशिक्षित मुलींनी नवं आयुष्य सुरू करायचं ठरवलं.

दोघींनीही खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. डॉ. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघी लेस्बियन आहेत. डॉ. सुरभी मित्रा या व्यवसायाने डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ असून त्या नागपुरात राहतात. सुरभी एका खाजगी रुग्णालयात काम करते, तर पारोमिता मुखर्जी अकाऊंटंट म्हणून काम करते. ती कोलकाता येथील रहिवासी आहे. दोघांच्या एकत्र राहण्याच्या निर्णयाला कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला आहे.

या दोघी कुठे भेटल्या? त्यांच्यात प्रेम कसे झाले? हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा स्पेशल व्हिडिओ...


हेही वाचा

Valentine Day Special : त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज नाही!

पुढील बातमी
इतर बातम्या