'तिनं' आजारालाही दिला 'स्ट्रोक'!

  • जिगर गणात्रा
  • समाज

मनी बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांपुढे कमकुवत ठरते. पण मेघा लांबा हे रसायन मात्र वेगळं म्हणता येईल! आजारावर मात करत ठरवलेलं उद्दिष्ट गाठणं सोपं नाही. पण हिंमत आणि इच्छाशक्तीच्या बळावर सर्व काही शक्य असतं हे मेघानं सिद्ध केलं आहे. २५ वर्षीय मेघाचा प्रवास सोपा नव्हता. पण तिनं लाचार होण्यापेक्षा संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. २५ वर्षीय मेघा आज एक आर्टिस्ट म्हणून नावारुपाला येत आहे. अर्थात यामागे तिची स्वत:वर घेतलेली मेहनत नक्कीच आहे.

मेघाला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्यामुळे तिला आर्ट आणि डुडलिंगमध्ये रूची होती. शिक्षण झाल्यानंतर तिनं याच क्षेत्रात करिअर करण्याचं देखील ठरवलं. १५ वर्षांची असताना मेघा आपल्या आई-वडिलांसोबत सिंगापूरला राहायला गेली. पण काही दिवसांनतर तिला अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे तिची उजवी बाजू निष्क्रीय झाली. त्यानंतर मात्र तिचं आयुष्य बदलून गेलं. अशा परिस्थितीत कुणीही खचून जाऊ शकतं. पण खचून न जाता मेघानं यावर मात करायचं ठरवलं. सिंगापूरमध्येच तिनं आर्ट्समधून ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं.

मेघा स्वतंत्र तर आहेच. पण ती खूप सकारात्मक देखील आहे. आम्ही नेहमीच तिला पाठिंबा दिला आहे. आजारावर मात करत तिनं स्वत:वर खूप काम केलं. त्यामुळे आज ती पहिल्यासारखं बोलू शकते. उजव्या हातानं शक्य नाही म्हणून ती डाव्या हातानं पेंटिंग्स काढते. तिच्या पेंटिंग्स मर्चंट नेव्हीच्या मोठ्या मोठ्या जहांजांमध्ये लावली गेली आहेत.

वंदना लांबा

सिंगापूरमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणीनं तिला पाठिंबा दिला. आता मेघा कुटुंबियांसोबत भारतात आली आहे. आता ती अनेक प्रदर्शनांमध्ये सहभागी होते. तिचे पेंटिंग्ज प्रदर्शनात देखील ठेवण्यात येतात. नुकतेच मुंबईतल्या 'द आर्ट एनक्लेव्ह' इथं तिचं पेंटिग ठेवण्यात आलं होतं.


हेही वाचा

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!

पुढील बातमी
इतर बातम्या