जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्हणजे कलेचं माहेरघर. इथल्या विद्यार्थींची विचार करण्याची पद्धत ही सर्वांहून हटकेच असते. याचं उत्तम उदाहरण इथल्या विद्यार्थ्यांनी नुकतंच दिलं. इथल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे जात एक अनोखी मोहीम राबवली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी...
प्रत्येक कलाकाराचं घर समजल्या जाणाऱ्या सर. जे. जे स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना करणारे सर जमशेठजी जीजीभॉय यांची २३५वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून पार पाडलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या सोहळ्याचं विशेष आकर्षक होते. सर जमशेठजी जीजीभॉय यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्तही विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये वृक्षारोपण केलं आहे. फक्त वृक्षारोपणच केलं नाही तर त्यांनी अशा रोपट्यांची लागवड केली आहे ज्यातून पुढे नैसर्गिक रंग उपलब्ध होऊ शकतील.
पूर्वी झाडांपासून तयार केलेले रंग वापरण्यात यायचे. यासाठीच रंगांची निर्मिती करणारी रोपटी लावण्यात आली. या झाडांपासून प्राथमिक पर्यावरणस्नेही रंगांची निर्मिती करता येऊ शकते. जवळपास २५ रोपांची लागवड करण्यात आली असून कल्याणमधल्या एका नर्सरीतून ही रोपटी आणण्यात आली आहेत.
मेंदी, हळद, हिरडा, पानवेल अशा झाडांची लागवड विद्यार्थ्यांनी केली आहे. यातून निर्माण होणारे नैसर्गिक रंग कला शाखेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रंग म्हणून वापरता येणार आहेत. या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक रित्या रंग कसे तयार करायचे? याची माहिती मिळावी, हा या मागचा उद्देश आहे.
हेही वाचा