मुंबईतील पवन बनला महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सजेंडर वकील

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

३० वर्षीय पवन यादव हा महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील दुसरा ट्रान्सजेंडर वकील बनला आहे. मुंबईतील गोरेगाव इथं पालकांसोबत राहणाऱ्या पवन यादवनं ट्रान्सजेंडर समुदायाला मोफत कायदेशीर मदत करण्याचे वचन दिले आहे.

पवन यादवला आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. मूळ उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या यादवनं आयपीएसची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी अलाहाबादला जाण्याची योजना आखली आहे.

माहितीनुसार, महाराष्ट्रात ४८,००० हून अधिक ट्रान्सजेंडर आहेत. तथापि, समाजातील लोक क्रूरता आणि सामाजिक भेदभावाच्या अधीन असल्यानं इतर ट्रान्सजेंडरना संपूर्ण कायदेशीर पाठिंबा देण्याचे यादव यांचे उद्दिष्ट आहे.

“मी महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार काऊन्सिलमध्ये प्रवेश घेतला आहे. मी पुढच्या वर्षीपासून दिंडोशी कोर्टात सराव सुरू करेन,” यादव यांनी मिड-डेला सांगितलं.

याआधी २०१८ मध्ये, सत्यश्री शर्मिला आपल्या देशातील अल्पसंख्याक समुदायातून मैलाचा दगड गाठणारी भारतातील पहिली ट्रान्सजेंडर वकील बनली.

शिवाय, ट्रान्सजेंडरना समान संधी मिळतील आणि त्यांच्याशी भेदभाव होणार नाही अशा अधिक समावेशक समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशानं, नवी दिल्लीनं १५ डिसेंबर रोजी प्रथमच राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पुरस्कारांचे आयोजन केले.


हेही वाचा

आधार कार्डसोबत मतदान कार्ड लिंक होणार

छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हल 'या' दिवशी आयोजित

पुढील बातमी
इतर बातम्या