Advertisement

आधार कार्डसोबत मतदान कार्ड लिंक होणार

आता आधार कार्डसोबत आपले मतदान कार्ड लिंक केले जाणार आहे.

आधार कार्डसोबत मतदान कार्ड लिंक होणार
SHARES

आता आधार कार्डसोबत आपले मतदान कार्ड लिंक केले जाणार आहे. लोकसभेत त्या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आज केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केले.

या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मध्ये बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक सुधारणांच्या दिशेनं हे महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात बुधवारी या बदलांना मंजुरी दिली होती.

सध्या ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे मतदाराची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाला. आता लोकसभेचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

मतदार यादीतील बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचं या विधेयकाच्या मसुद्यात सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे.

निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मोठे बदल केंद्र सरकारनं केले आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा