गरीबांची भूक भागवणारा अनोखा 'फ्रिज'

  • मानसी बेंडके
  • समाज

लग्नसमारंभ किंवा घरात आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर उरलेलं अन्न बहुतांश वेळी टाकून दिलं जातं. एकीकडे अन्नधान्याची कमतरता आणि दुसरीकडे वाया जाणारं अन्न असा विरोधाभास आपल्या देशात पाहायला मिळतो. हे अन्न वाया जाण्याऐवजी गोरगरीबांच्या पोटात गेले तर काय वाईट? असाच विचार करून मुंबईतल्या वर्सोव्यामध्ये 'कम्युनिटी फ्रिज' ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  

काय आहे संकल्पना?

कम्युनिटी फ्रिज म्हणजे फूड बँकच. अनेक गोरगरीब, रोजंदारीवर काम करणारे, हमाली करणारे, कचरा वेचणारे अशा अनेकांच्या पोटाची दोन वेळची भूक मोफत भागवणारा अनोखा फ्रिज भुकेल्यांसाठी 'अन्नपूर्णाच' बनला आहे. 'वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन'तर्फे या कम्युनिटी फ्रिजची संकल्पना राबवण्यात आली आहेवर्सोवा इथल्या वटेश्वर मंदिराच्या बाजूला हा फ्रिज ठेवण्यात आला आहे.

वर्सोव्यात राहणारे अनेकजण वाढदिवस किंवा पार्टीत उरलेलं ताजं जेवणही या फ्रिजमध्ये आणून ठेवतात. सकाळी १०.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत या फ्रिजमधून गरजूंना मोफत अन्न दिलं जातं. इडली, वडापाव, चपाती-भाजी, फळं असं बरचं काही इथल्या फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात तर आईस्क्रीम, दही आणि ताक हे देखील ठेवलं जातं. फ्रिजमध्ये अन्न ठेवणाऱ्यांची इथल्या एका वहीत नोंद केंली जाते. अन्न देण्यासाठी इथं प्लेट्स, ताट, वाट्या देखील ठेवलेल्या असतात.

कशी सुचली संकल्पना?

वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ हेगडे यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेमुळे जवळपास १००च्या आसपास गोरगरिबांना पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न मिळतं.    

मी एकदा हॉटेलमध्ये खायला गेलो होतो. त्यावेळी अनेकांनी अन्न टाकून दिलेलं मी पाहिलं. तेव्हाच एक गरीब मुलगी हॉटेलबाहेर भिक मागताना मी पाहिली. मी हॉटेल मालकाला विचारलं की उरलेल्या अन्नाचं काय करता? तेव्हा तो म्हटला की आम्ही टाकून देतो. तिथून निघाल्यावर काही दिवसांनी मी एक बातमी वाचली की, कोचीमध्ये एका हॉटेल मालकानं अन्न वाया जाऊ नये म्हणून कम्युनिटी फ्रिजची स्थापना केली. हॉटेलमध्ये उरलेलं अन्न तो एका फ्रिजमध्ये ठेवायचा आणि ते अन्न गोरगरीब खायचेतेव्हा मला या कम्युनिटी फ्रिजची संकल्पना सुचलीही संकल्पना मी वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनमधल्या सदस्यांना सांगितलीत्यानुसार आम्ही वर्सोवामध्ये कम्युनिटी फ्रिजची स्थापना केली.

- गोपाळ हेगडे, अध्यक्षवर्सोवा वेल्फेअर असोसिएशन

वर्सोव्यात राहणारे रहिवासी, हॉटेल्स आणि केटरर्स यांच्याकडून देखील या फ्रिजमध्ये अन्नाचे पॅकेट्स ठेवले जातात. याशिवाय परिसरात राहणाऱ्या वर्षा भागचंदानी देखील रोज सकाळ-संध्याकळ ५० जेवणाचे पॅकेट्स फ्रिजमध्ये आणून ठेवतात. यामध्ये डाळ-भात, चपाती-भाजी अशी पॅकेट वर्षा स्वतठेवतात. त्याचे जे काही पैसे होतात ते वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य स्वत:च्या खिशातून देतात. तर काही नागरिक पैसे देतात त्यानुसार वर्षा त्यांना हवा तो पदार्थ बनवून देतात. वर्षा स्वत: व्यवस्थित पॅकिंग करून पॅकेट्स फ्रिजमध्ये ठेवतात.

कुणाच्या घरात आनंदाची गोष्ट असेल किंवा वाढदिवस असेल, तर काहीजण खाण्याचे पॅकेट्स किंवा केक, समोसे, फ्रुटी असं बरंच काही ठेवतात. अन्न काढून ठेवण्यासाठी दोन तरूण देखील तिथे ठेवण्यात आले आहेत. हे तरूण त्यांना फ्रिजमधून अन्न काढून देतात. संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद पाहता आणखी दोन-तीन ठिकाणी कम्युनिटी फ्रिजची स्थापना करण्यात आलीअंधेरीच्या डिएननगरमध्येसात बंगला आणि लोखंडवाला या ३ ठिकाणी हे फ्रिज  ठेवण्यात आले आहेतअन्न खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळत असल्याचं गोपाळ हेगडे यांनी सांगितलं.

तुम्ही होऊ शकता सहभागी

हेगडे यांनी सुरू केलेल्या संकल्पनेचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही. तुम्ही देखील या संकल्पनेचा भाग होऊ शकता. वाढदिवसाला पार्टी वैगरे देण्याऐवजी जर तुम्ही कम्युनिटी फ्रिजमध्ये काही पदार्थ गरजूंची भूक भागवण्यासाठी ठेवलं, तर नक्कीच समाधान मिळेल. याशिवाय तुम्ही स्वत:च्या हॉटेलबाहेर किंवा परिसरात एखादा असा फ्रिज ठेवू शकता. जेणेकरून गरजूंचं दोन वेळेचं पोट भरेल.


हेही वाचा-

ठाकूर व्हिलेजच्या रहिवाशांचे 'ऑपरेशन खटारा'


पुढील बातमी
इतर बातम्या