वर्ल्ड आर्चरी पॅरा चॅम्पियनशीपसाठी आदिलची निवड

चीनच्या बीजिंग शहरात १२ सप्टेंबर पासून 'वर्ल्ड आर्चरी पॅरा चॅम्पियनशीप' स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आर्चरी अॅकॅडमीतील खेळाडू धनुर्धारी आदिल अन्सारी याची निवड करण्यात आली आहे.

आदिल २०१५ पासून सावरकर स्मारक आर्चरी अॅकॅडमीत सराव करत आहे. आदिलने २०१६ मध्ये हरियाणा येथील रोहतांगमध्ये झालेल्या 'नॅशनल पॅरा आर्चरी स्पर्धे'त सुवर्णपदकला गवसणी घातली होती. पॅरा आर्चरी प्रकार नव्हता तेव्हाही आदिलने दिव्यांग असूनही खुल्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले आहे.

जागतिक स्पर्धेसाठी आदिलची निवड झाल्याने सावरकर स्मारक अॅकॅडमीतील सहकारी आणि प्रशिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. सध्या आदिल प्रशिक्षक स्वप्नील परब यांनी मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहे. या जागतिक स्पर्धेसाठी स्मारक कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी आदिलला शुभेच्या दिल्या आहेत.


हे देखील वाचा -

मुंबईच्या नथुरामची स्पेनच्या 'मॉडर्न पेंटथलोन' स्पर्धेत निवड


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या