मुंबईच्या नथुरामची स्पेनच्या 'मॉडर्न पेंटथलोन' स्पर्धेत निवड


  • मुंबईच्या नथुरामची स्पेनच्या 'मॉडर्न पेंटथलोन' स्पर्धेत निवड
SHARE

स्पेनमध्ये २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'मॉडर्न पेंटथलोन' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुंबईच्या नथुराम सूर्यवंशी सोबत ठाण्याच्या ओमकार कुचिक आणि पालाश ठाकूर यांची निवड झाली आहे.

१२ ऑगस्ट रोजी झालेल्या 'राष्ट्रीय मॉडर्न पेंटथलोन' स्पर्धेत पुरुष सिनियर गटात ओमकार कुचिक यांनी सुवर्ण पदक तर नथुरामने रौप्य पदक आणि ज्युनियर युवक गटात पालाश ठाकूरने रौप्यपदक मिळविले होते. चमकदार कामगिरीच्या आधारेच या तिघांची निवड करण्यात आली आहे.या स्पर्धेत 'डॉल्फिन वेल्फेअर असोसिएशन'च्या खेळाडूंनी देखील बाजी मारली. या खेळाडूंनी बायथाल आणि ट्रायथालमध्ये एकूण ६५ पदके मिळविली. त्यात ट्रायथालमधील ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा, तर बायथालमधील १७ सुवर्ण, १७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.

ओमकार कुचिक, नथुराम सूर्यवंशी आणि पलाश ठाकूर हे तिघेही सध्या स्पेनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहेत. सरावासाठी त्यांनी वेळेचे नियोजन केले असून प्रशिक्षक देखील स्पर्धेच्या दृष्टीने त्यांच्याकडून खडतर सराव करून घेत आहेत.हे देखील वाचा -

मुंबईची चीनमध्ये दादागिरी!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या