मुंबईची चीनमध्ये दादागिरी!

  Mumbai
  मुंबईची चीनमध्ये दादागिरी!
  मुंबई  -  

  चीनमध्ये झालेल्या आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईकर मुलांनी आपापल्या गटात कांस्यपदकाची कमाई करत मुंबईचे नाव चीनमध्ये झळकावले आहे. आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया हे दोघेही दक्षिण मुंबईच्या बुद्धिबळ अकादमी (एसएमसीए) येथे सराव करतात. चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत 8 वर्षांच्या मास्टर सुहानीने आपले वर्चस्व राखत मुंबईच्या पदरात एका कांस्य पदकाची भर पाडली.


  दोन महिन्यात मिळवली दोन पदके

  याआधीही महिन्याभरापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत मुंबईकरांचे मन सुहानीने जिंकले होते. त्याच प्रमाणे आता पुन्हा एकदा तिने चीनमध्ये झालेल्या 9 वर्षांखालील स्पर्धेत चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत आणखी एका पदकावर आपले नाव कोरले आहे.


  आदित्यने केली कांस्य पदकाची कमाई

  आदित्यने देखील 7 वर्षांच्या जलद गटात विजय मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत आदित्यने 7 पैकी 5 गुणांची कमाई करत कांस्यपदक आपल्याकडे खेचले. यावेळी चीनच्या चेन झियुआन यानेदेखील 7 पैकी 5 गुण मिळवले होते. पण सर्वोत्तम सरासरीवर रौप्य पदकाची माळ ही आदित्यच्या गळ्यात पडली. या स्पर्धेत एकूण 10 देशांतील 26 खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये फिलिपाईन्सच्या अल बाशर याने स्पर्धेत आपले वर्चस्व राखत 7 पैकी 7 गुण मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला.


  आदित्य आणि सुहानी हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. आदित्यचे भविष्य उज्ज्वल आहेच, तसेच सुहानी सध्या आघाडीवर आहे. तिने लागोपाठ दोन विजय मिळवून उत्तम कामगिरी केली. भविष्यात ती भारतीय बुद्धिबळ जगतात स्टार खेळाडू ठरेल.

  बालाजी गुत्ताला, फिडे मास्टर, बुद्धिबळ अकादमी, दक्षिण मुंबई


  हेही वाचा -

  दृष्टिहीन आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची टक्कर

  मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.