Advertisement

बुद्धीबळ स्पर्धेत 8 वर्षांच्या सुहानीला कांस्यपदक


बुद्धीबळ स्पर्धेत 8 वर्षांच्या सुहानीला कांस्यपदक
SHARES

राष्ट्रकुल बुद्धीबळ स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईकर सुहानी लोहियाने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या गटात झालेल्या सात खेळांमध्ये 5.5 गुण मिळवून सुहानी तिसऱ्या स्थानावर राहिली. ही स्पर्धा दिल्लीत झाली होती. याआधी देखील तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 7 वर्षांखालील गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.



सुहानी ही धिरुभाई अंबानी शाळेची विद्यार्थिनी असून ती नरिमन पॉईंट येथे असलेल्या दक्षिण मुंबई चेस अकादमीमध्ये बुद्धीबळचे प्रशिक्षण घेते.

सुहानी आणि हिया पांचाल या दोघी दुसऱ्या स्थानावर खरंतर बरोबरीत होत्या. पण टाय ब्रेकमुळे सुहानीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर, सुवर्णपदकाची कमाई कर्नाटकची खेळाडू मास्टर शेफाली ए. एन. हिने केली. तिने 6 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.


सुहानी ही अतिशय हुशार आहे. तिला आणखी चांगले मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात होणाऱ्या स्पर्धेत ती आणखी चांगली कामगिरी करेल. जागतिक स्तरावर देखील ती चमक दाखवू शकते. भविष्यात भारतातील एक चांगली बुद्धीबळपटू म्हणून ती समोर येईल.

- बालाजी गुट्टला, मुख्य प्रशिक्षक, दक्षिण मुंबई चेस अकादमी



हेही वाचा - 

दृष्टिहीन आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची टक्कर

'फिडे बुद्धीबळ' स्पर्धेत आयएम समीर कठमाळे अजिंक्य


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा