दृष्टिहीन आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची टक्कर

 Mumbai
दृष्टिहीन आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची टक्कर

मुंबई - उडुपीच्या मणिपाल युनिवर्सिटीत दृष्टीहीनांची आशियाई बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात मुंबईचे चार खेळाडू सहभागी झाले आहेत. वैशाली सालवकर, स्वप्नील शाह, शिरीष पाटील आणि सचिन वाघमारे अशी या चार खेळाडूंची नावे आहेत.

युधाजित दे ने चौथ्या फेरीत वैशाली सालवकरला हरवले. चौथ्या फेरीनंतर तिचे दोन गुण आहेत. मंगळवारी तिचा सामना मरिमुथु याच्यासोबत होणार आहे. तर स्वप्नील शाहने चौथ्या फेरीत चांगला खेळ दाखवला. चौथ्या फेरीत त्याने अडीच गुणांची कमाई केली. चौथ्या फेरीत स्वप्नीलने शिरीष पाटीलला फक्त 15 चालींमध्ये पराभूत केले. स्वप्नीलचा सामना मंगळवारी सचिन वाघमारेसोबत होणार आहे. या स्पर्धेत भारताचा किशन गांगुली 4 गुणांनी पहिल्या स्थानावर आहे. या स्पर्धेत अजून चार फेऱ्या बाकी आहेत. त्यात कोण बाजी मारेल हे पाहणे औसुक्याचे आहे.

Loading Comments