Advertisement

'फिडे बुद्धीबळ' स्पर्धेत आयएम समीर कठमाळे अजिंक्य


'फिडे बुद्धीबळ' स्पर्धेत आयएम समीर कठमाळे अजिंक्य
SHARES

दहिसर येथील समाज कल्याण केंद्रात झालेल्या फिडे बुध्दिबळ स्पर्धेचा अंतिम अकरावा साखळी सामना अग्र पटावरील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुध्दिबळपटूच्या दर्जेदार खेळाने रंगला. युनिव्हर्सल चेस फाउंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती.

इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळेने ओमकार कडवला निर्णायक अकराव्या साखळी सामन्यामध्ये शह देत नववा गुण वसूल केला. उत्तम सरासरीच्या बळावर मुंबईचा इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, अतुल डहाळे, फिडे मास्टर सौरव खेर्डेकर आणि अग्र गुणांकित राकेश कुलकर्णी यांच्या ९ गुणांच्या बरोबरीला मागे टाकून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

दहाव्या फेरीच्या आघाडीवीर अग्र गुणांकित राकेश कुलकर्णीचा इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने तर द्वितीय स्थानाचा आघाडीवीर चिन्मय कुलकर्णीचा फिडे मास्टर सौराव खेर्डेकरने चुरशीच्या लढतीत पराभव करून नववा गुण कमावला. परंतु अंतिम विजेतेपदासाठी त्याचा लाभ उत्तम सरासरीद्वारे समीर कठमाळेला झाला. स्पर्धेमधील द्वितीय पुरस्कार विक्रमादित्य कुलकर्णीने, तृतीय पुरस्कार अतुल डहाळेने, चतुर्थ पुरस्कार सौरव खेर्डेकरने तर पाचवा पुरस्कार राकेश कुलकर्णीने पटकावला. विजेत्या सांगलीच्या समीर कठमाळेला रोख रुपये 51 हजार पुरस्कारासह आकर्षक चषक माजी आमदार विनोद घोसाळकर आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा