मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस

 Mumbai
मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस
मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस
मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस
See all

वांद्रे - आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेची चुरस कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 26 डिसेंबरपासून पहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतासह एकूण 17 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. 13 वर्ष आणि त्या खालील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एकूण 9 दिवस 9 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत 16 ग्रँडमास्टर, 4 महिला ग्रँडमास्टर आणि 11 इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंनी सहभाग घेतलाय. खुल्या गटासाठी 12 लाख रुपयांचं पारितोषिकं ठेवण्यात आली असून 13 वर्षांखालील गटासाठी 8 लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेत भारतासह अर्मेनिया, बांगलादेश, बेल्जियम, इजिप्त, इंग्लंड, फ्रान्स, हंगेरी, इटली, मलेशिया, फिलिपीन्स, पोलंड, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युक्रेन आणि उझबेकिस्तान या देशांतील खेळाडूंचाही सहभाग आहे.

Loading Comments