सीसीअाय केकू निकोल्सन बिलियर्डस लीग सोमवारपासून रंगणार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाचे (सीसीअाय) दिवंगत अध्यक्ष केकू निकोल्सन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सीसीअायवर २ एप्रिलपासून बीएसएएम बिलियर्डस लीग रंगणार अाहे. बीएसएएमने सीसीअायचा प्रस्ताव मान्य करत अापली वार्षिक लीग नव्या नावासह अायोजित करण्याचा निर्णय घेतला अाहे. अाता ही लीग सीसीअाय केकू निकोल्सन बीएसएएम बिलियर्डस लीग २०१८ या नावाने अोळखली जाणार अाहे.

२८ संघांचा समावेश

या वर्षीच्या बिलियर्डस लीगमध्ये एकूण २८ संघांचा समावेश असणार अाहे. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या लढतींना २ एप्रिलपासून सुरू होणार अाहे. त्यानंतर बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. बाद फेरीचे सामने मे महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात सीसीअायच्या बिलियर्डस रूममध्ये रंगतील.

स्टार बिलियर्डसपटूंचा सहभाग

बिलियर्डस लीगमध्ये देशातील टाॅपच्या बिलियर्डसपटूंचा सहभाग असणार अाहे. माजी जागतिक बिलियर्डस चॅम्पियन अशोक शांडिल्य, दोन वेळा अाशियाई बिलियर्डस चॅम्पियन ठरलेला ध्रूव सितवाला, दोन वेळा अाशियाई स्नूकर स्पर्धा जिंकणारा यासिन मर्चंट अाणि जागतिक बिलियर्डसमध्ये कांस्यपदक पटकावणारा सिद्धार्थ पारीख यांचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार अाहे.


हेही वाचा -

ब्रिजेश दमाणीने पटकावले सीसीअाय स्नूकर स्पर्धेचे जेतेपद

पुढील बातमी
इतर बातम्या