Advertisement

ब्रिजेश दमाणीने पटकावले सीसीअाय स्नूकर स्पर्धेचे जेतेपद


ब्रिजेश दमाणीने पटकावले सीसीअाय स्नूकर स्पर्धेचे जेतेपद
SHARES

दिग्गज स्नूकरपटूंना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर इंडियन अाॅईलच्या ब्रिजेश दमाणी याने अोएनजीसीच्या सौरव कोठारी याच्यावर ७-१ अशा फरकाने मात करत सीसीअाय अाॅल इंडिया अोपन स्नूकर चॅम्पियनशिपवर मोहोर उमटवली. या कामगिरीसह दमाणीने दोन लाखांच्या बक्षिसासह सीसीअाय ट्राॅफी पटकावली. उपविजेत्या कोठारीला १.३० लाख रुपयांवर समाधान मानावे लागले.


कोठारीचा वाईट दिवस

इतक्या सहजपणे मी जिंकेन, याची अपेक्षाही केली नव्हती. प्रतिस्पर्ध्याचा दिवस वाईट असेल, तेव्हाच हे शक्य होते. सौरव कोठारी हा तगडा प्रतिस्पर्धी असून त्याच्यात अफाट गुणवत्ता अाहे. पण मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत सातत्याने कामगिरी केली. कोलकाता इथं २०१५ मध्ये मी ६-१ इतक्या फरकानं कोठारीला हरवलं होतं, याचीही अाठवण ब्रिजेश दमाणी याने बोलून दाखवली.


चुकांची पुनरावृत्ती कोठारीला भोवली

सौरव कोठारीने अाश्वासक सुरुवात केली, पण पहिली फ्रेम जिंकण्याच्या स्थितीत असताना कोठारीने एक सोपी चूक केली. त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. दुसऱ्या फ्रेममध्येही कोठारीने केलेल्या चुकीमुळे दमाणीने अाघाडी घेत सामन्यात २-० अशी सरशी साधली. अटीतटीच्या रंगलेल्या तिसऱ्या फ्रेममध्ये अखेरच्या क्षणी कोठारीने दमाणीला पेनल्टी गुण बहाल केले, त्यामुळे दमाणीने ३-० अशी अाघाडी घेतली. त्यानंतर पुढील दोन फ्रेम जिंकून दमाणीने विजयाच्या दिशेने कूच केली. अखेर सहाव्या फ्रेममध्ये दमाणीचे अाव्हान मोडीत काढून कोठारीने रंगत निर्माण केली. पण दमाणीने पुढील दोन्ही फ्रेम जिंकून ५७-४८, ८६-६, ५७-८, ५५-५१, ६५-५४, ५-७९, ७५-२० अाणि ७२-२ अशा फरकासह विजेतेपद पटकावले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा