जयपूर फुट घालून वीर दौडले चार...

'ब्लेड रनर' अाॅस्कर पिस्टोरियने कृत्रिम पाय लावून सशक्त असलेल्या पुरुषांच्या अाॅलिम्पिकमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला होता. एरव्ही सराव नसताना दोन पायांसह धावतानाही अनेकांची तारांबळ उडते. मात्र यंदाच्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये चार वीर चक्क जयपूर फुट परिधान करून दौडले.

यंदाच्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये ४४५०० जणांनी अापला सहभाग नोंदवला होता. यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध, दिव्यांग या सर्वांनीच भाग घेतला होता. मात्र रत्ना निधी ट्रस्टने कृत्रिम पाय लावण्यासाठी चार जणांकरिता जयपूर फुटची सोय केली होती. अशा ४ दिव्यांगांनी मॅरेथाॅन स्पर्धेत ड्रीम रनमध्ये भाग घेतला अाणि त्यांनी ती पारही केली.

'मुंबई दिव्यांगमुक्त करा'

टाटा मुंबई मॅरेथाॅनमध्ये रत्ना निधीच्या सहकार्याने 'मुंबई दिव्यांगमुक्त करा' असा संदेश देण्यात अाला. राजू करे, अाशिष झा, विश्वनाथन गुरव अाणि महेश कांबळे हे चौघेही अपघातात जखमी झाले होते. त्या चौघांनी जयपूर फुट घालून मुंबई मॅरेथाॅनमध्ये भाग घेतला.

दिव्यांग व्यक्तीही या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत, हे आपण सर्वांनीच ओळखलं पाहिजे. त्यांच्याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अाम्ही मुंबई दिव्यांगमुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी ड्रीम रनमध्ये सहभागी झालो.

- राजीव मेहता, विश्वस्त, रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट


हेही वाचा - 

मुंबई मॅरेथाॅनवर यंदाही इथियोपियाचं वर्चस्व, साॅलोमन डेक्सिसा, अमाने गोबिबा यांना विजेतेपद

अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…


पुढील बातमी
इतर बातम्या