Advertisement

मुंबई मॅरेथाॅनवर यंदाही इथियोपियाचं वर्चस्व, साॅलोमन डेक्सिसा, अमाने गोबेना यांना विजेतेपद


मुंबई मॅरेथाॅनवर यंदाही इथियोपियाचं वर्चस्व, साॅलोमन डेक्सिसा, अमाने गोबेना यांना विजेतेपद
SHARES

मुंबई मॅरेथाॅनला जेव्हापासून सुरुवात झाली,तेव्हापासून केनिया अाणि इथियोपियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं अाहे.यंदाही इथियोपियाच्या धावपटूंनी टाटा मुंबई मॅरेथाॅनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.पूर्ण मॅरेथाॅनमध्ये पुरुषांच्या गटात साॅलोमन डेक्सिसा याने २ तास ०९ मिनिटे ३४ सेकंद अशी वेळ नोंदवत तर महिलांमध्ये अमाने गोबेना हिने २ तास २५ मिनिटे ४९ सेकंद अशी कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.भारतीयांमध्ये गोपी थोनाकल,सुधा सिंग यांनी विजेतेपद

भारतीय धावपटूंमध्ये गोपी थोनाकल यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.गोपीसमोर नितेंद्रसिंग रावतने कडवे अाव्हान उभे केले होते.अखेरच्या १०० किलोमीटरच्या टप्प्यात गोपीने चौथा गिअर टाकत नितेंद्रसिंगला मागे टाकले अाणि अवघ्या तीन सेकंदाच्या फरकाने पुरुषांची पूर्ण मॅरेथाॅन जिंकली.महिलांमध्ये सुधा सिंग विजेती होणार,याची सर्वांनाच अपेक्षा होती.पण २१ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर सुधा सिंगच्या मांडीचे स्नायू ताणले गेले.तरीही हार न मानता २ तास ४८ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ नोंदवून तिने महिलांच्या पूर्ण मॅरेथाॅनचे विजेतेपद पटकावले.


मुंबईतील उष्ण वातावरणाचा अॅथलिट्सना फटका

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा उन्हाळा सुरू झाला की काय,असं वाटू लागलं होतं.एेन जानेवारीत जाणवणाऱ्या उन्हाचा फटका अॅथलीट्सना बसला.सकाळी ७.१० वाजता पूर्ण मॅरेथाॅनला सुरुवात झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी ९.१५ वाजते.सुरुवातीचे २१ किमी.चे अंतर वेगाने पार करणाऱ्या धावपटूंची नंतरच्या टप्प्यात मात्र पुरती दमछाक झाली.अखेरच्या ५ किमीच्या टप्प्यात वेग वाढवण्याची गरज असताना काही धावपटूंनी पाणीच मिळाले नाही.त्यामुळे अपेक्षित वेळेनुसार ही मॅरेथाॅन पूर्ण न करता अाल्याची तसंच अायोजनात अनेक त्रूटी असल्याची खंत विजेत्या धावपटूंनी बोलून दाखवली.मेट्रोच्या कामामुळे धावपटूंची पंचाईत

मुंबईत होणाऱ्या मेट्रोमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात अाले अाहेत.रस्त्याचा अर्धा भाग व्यापला गेल्यामुळे अनेक ठिकाणी मॅरेथाॅनचे मार्ग बदलण्यात अाले होते.मात्र जिकडून शर्यतीला सुरुवात होते अाणि संपते अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या पाच किलोमीटरच्या टप्प्यात एलिट अॅथलिट्स शर्यत पूर्ण करण्यासाठी येत असताना त्यांच्या मार्गात हौशी अॅथलिट्सचा अडथळा निर्माण होत होता.त्यामुळे एखादा धावपटू अापल्याला धडकणार तर नाही ना,याकडे लक्ष देताना एलिट अॅथलिट्सची पंचाईत झाली होती.


हेही वाचा -

हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा, महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव, मोनिका आथरेची बाजी

अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…

संबंधित विषय