मुंबई-पुणे सायकल शर्यतीत दिलावरजी बाजी

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमानं अायोजित करण्यात अालेल्या प्रतिष्ठेच्या जायंट स्टारकेन मुंबई-पुणे सायकल शर्यतीत स्पर्धकांनी वाऱ्याच्या वेगावर स्वार होत सायकलिंगचा थरार अनुभवला. हरयाणाछ्या दिलावरने ३ तास ४७ मिनिटे अाणि २८.७५५ सेकंद अशी वेळ नोंदवत या शर्यतीचं जेतेपद पटकावलं. अार्मीच्या किशोर जाधवला एका सेकंदाच्या फरकामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. किशोर जाधवनं ३ तास ४७ मिनिटे २९.०३४ सेकंद अशी वेळ देत प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र अवघ्या एका सेकंदानं त्याचं विजेतेपद हुकलं.

संदेश उप्पर ठरला घाटाचा राजा

अत्यंत खडतर असा बोरघाट पार करणाऱ्या सायकलपटूला 'घाटाचा राजा’ या किताबानं गौरवण्यात येतं. यावर्षी ही किमया रेल्वेच्या संदेश उप्पर यानं केली. त्यानं २२ मिनिटे २५.५६४ सेकंद अशी कामगिरी करून घाटाचा राजा किताब पटकावला. त्याला २५ हजार रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात अालं.

ढिसाळ अायोजन

मुंबईतील काळाघोडा इथून सुरू झालेल्या या शर्यतीचा समारोप पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर होणार होता. पण अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक सुरू असल्यामुळे सायकलपटूंना मार्ग काढणे कठीण जात होते. काही ठिकाणी सायकलस्वारांना वाहनांनी धडक दिल्याचीही चर्चा होती. त्यामुळे स्पर्धकांनी शर्यतीच्या अायोजनाबाबत नाराजी व्यक्त केली अाहे. विजेत्या स्पर्धकांना एकूण सहा लाख २५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात अाली.


हेही वाचा -

जायंट स्टारकेन मुंबई-पुणे सायकल शर्यतीचा थरार २५ मार्चला

पुढील बातमी
इतर बातम्या