मान्सून मॅरेथाॅन चॅलेंज २०१८ बीकेसीत २२ जुलैला रंगणार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

भर पावसाळ्यात विकेंडला मस्त निसर्गाचा अानंद लुटायचा, हा अनेकांचा प्लान असतो. पण या अाठवड्यात तुम्हाला भर पावसात धावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. भारतातील लोकप्रिय शर्यत असलेल्या मान्सून मॅरेथाॅन चॅलेंजचे सातवे पर्व रविवारी २२ जुलै रोजी जिअो गार्डन, जी ब्लाॅक, वांद्रे-कुर्ला संकुल येथे पार पडणार अाहे. ५ किमी, १० किमी अाणि २१ किमी (अर्धमॅरेथाॅन) या तीन गटांमध्ये होणाऱ्या या शर्यतीला सकाळी ६.१४ वाजता सुरुवात होणार अाहे. तिन्ही गटांत मिळून ३५०० स्पर्धक पावसाचा अानंद लुटत धावताना दिसणार अाहेत.

झहीर खानची उपस्थिती

स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान अापली पत्नी सागरिका घाटगे हिच्यासह उपस्थित राहणार अाहे. त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात होईल. अर्धमॅरेथाॅन गटात ५००, १० किमी गटात २५०० तर ५ किमी गटात ५०० धावपटू सहभागी होणार अाहेत. १० ते १७ वर्षांखालील गटात ५५ मुलेही भाग घेणार अाहेत.

२ लाखांची बक्षिसे

कनकिया मान्सून मॅरेथाॅन चॅलेंज २०१८ मध्ये विजयी होणाऱ्या विविध गटातील स्पर्धकांना २ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार अाहेत. त्याचबरोबर नुकतीच दक्षिण अाफ्रिकेतील काॅम्रेड अल्ट्रा मॅरेथाॅन पूर्ण करणारे रनइंडियारनचे ११ धावपटू स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी धावतील. हे धावपटू फिटनेसचा संदेशही देतील.


हेही वाचा -

अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…

पेसरची दुनिया...


पुढील बातमी
इतर बातम्या