Advertisement

पेसरची दुनिया...


पेसरची दुनिया...
SHARES

पेसर किंवा पेसमेकर किंवा पेससेटर किंवा रॅबिट... मॅरेथाॅनमध्ये एलिट अॅथलिट्सचा वेग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारा घटक म्हणजे पेसर. ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथाॅनमध्ये किंवा २१.०९७ किमीच्या अर्धमॅरेथाॅनमध्ये विश्वविक्रम किंवा विक्रम रचण्यासाठी मॅरेथाॅन अायोजकांकडून पेसरच्या टीमची नियुक्ती केली जाते. व्यावसायिक अॅथलीट्स असलेल्या या पेसरना अापल्या कामासाठी घसघशीत मानधनही मिळतं. १९५४ सालापासून हा सिलसिला सुरू झाला, तो अाजतागायत सर्व प्रतिष्ठेच्या मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये सुरू अाहे. निश्चित केलेल्या एका ठरावीक टप्प्यापर्यंत धावपटूंना वेगात घेऊन जाणं, त्यांना विक्रम रचण्यासाठी प्रोत्साहित करणं अाणि त्यानंतर स्वत: माघार घेणं, ही त्यांची भूमिका असते. त्यांना ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेगाने अंतर कापण्याची क्षमता त्यांच्यात असते. म्हणूनच शर्यतीचा वेग वाढवत नेत पेसरनं विजेतेपद पटकावल्याच्या घटनाही घडल्या अाहेत.


पेसरचं काम?

शर्यतीला सुरुवात झाल्यापासूनच एलिट अॅथलिट्सचा वेग वाढवणं, हे पेसरचं मुख्य काम. एलिट अॅथलिट्सच्या समूहाला किंवा टोळक्याला शर्यतीच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत किंवा त्यापुढेही घेऊन जाण्याची भूमिका पेसरवर असते. त्यासाठी पेसरला अायोजकांकडून घसघशीत मानधन दिलं जातं. काही वेळेला कमी टप्प्याच्या शर्यतींसाठी अॅथलीट्स अापला वेग वाढावा अाणि अपेक्षित वेळ नोंदवता यावी, यासाठी स्वतःच पेसरची नियुक्ती करतात.


पेसरसोबत धावण्याचे फायदे

पेसरच्या टीमसोबत धावण्याचे अनेक फायदे अाहेत. नवीन अॅथलिट्सना शर्यत पूर्ण करण्याचा अनुभव नसतो. त्यामुळे काही वेळेला काही अॅथलीट्स सुरुवातीलाच अापला वेग वाढवतात अाणि नंतर शर्यत पूर्ण करताना त्यांची दमछाक होते. पण पेरर्सच्या टोळक्यासोबत धावताना भलेही सुरुवात काहीशी धीम्या गतीची झाली असेल पण हे पेसर हळूहळू वेग वाढवत नेतात अाणि अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करण्याची संधी अॅथलिट्सला मिळते.


सध्या चलती पेसरची

अाॅलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये व्यावसायिक पेसर नसल्यामुळे या शर्यती निरसवाण्या होतात. हल्ली जगात जिकडे-तिकडे मॅरेथाॅन शर्यतींचे पेव फुटले अाहे. त्यामुळे पेसरना सध्या सुगीचे दिवस अाले अाहेत. अनेक व्यावसायिक पेसरना मॅरेथाॅन अायोजकांकडून प्रचंड अार्थिक मोबदला मिळत असल्यामुळे अनेक एलिट अॅथलिट्सचा पेसर बनण्याकडे कल वाढला अाहे. जगभर होणाऱ्या सर्वाधिक इनाम असलेल्या मॅरेथाॅन स्पर्धांमुळे सध्या पेसरची चलती सुरू अाहे. सध्या मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये पेसरचा बोलबाला असला तरी विश्वविक्रम नोंदवल्या गेलेल्या सर्व पूर्ण मॅरेथाॅनमध्ये पेसरची भूमिका ही सर्वात महत्त्वाची ठरली अाहे.


हेही वाचा - 

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनची समग्र माहिती हवीय? मग हे वाचा

रंजित विजयन मुंबई मॅरेथाॅनमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याचा गिनिज जागतिक विक्रम नोंदवणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा