Advertisement

रंजित विजयन मुंबई मॅरेथाॅनमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याचा गिनिज जागतिक विक्रम नोंदवणार


रंजित विजयन मुंबई मॅरेथाॅनमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याचा गिनिज जागतिक विक्रम नोंदवणार
SHARES

मुंबईकरांना फिटनेसचे वेड लावणारी अाणि अातापर्यंत मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्या टाटा मुंबई मॅरेथाॅनमध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या उद्देशाने धावत असतो. काही जण सामाजिक संदेश देण्यासाठी तर काही जण नववर्षाच्या सुरुवातीला केलेला फिटनेसचा संकल्प पूर्ण करण्यासाठी धावत असतो. पण रंजित विजयन नावाचा ३९ वर्षांचा अलविया मुंबई मॅरेथाॅनमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याचा गिनिज रेकाॅर्ड अापल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात अाहे. २१ जानेवारीला रंगणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये रंजित नव्या विक्रमाला गवसणी घालतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.


२०१५ मध्ये २०० क्यूब सोडवण्याचा होता विक्रम

२०१५ साली सिंगापूर मॅरेथाॅनमध्ये सहभागी होत रंजित विजयन यांनी तब्बल २०० रुबिक क्यूब यशस्वीपणे सोडवत गिनिज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये अापले नाव नोंदवले होते. तब्बल पाच तासांच्या वेळेत त्यांनी २०० क्यूब सोडवण्याचा पराक्रम केला होता.


न्यूझीलंडच्या धावपटूने मोडला विक्रम

न्यूझीलंडच्या एका धावपटूने रंजित विजयन यांचा हा विक्रम मोडीत काढत नव्या विक्रमाची नोंद केली होती. अाता पुन्हा एकदा रुबिक क्युब सोडवण्याचा विक्रम अापल्या नावावर करण्यासाठी रंजित यांनी कंबर कसली अाहे. गिनिज वर्ल्ड रेकाॅर्डसने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या एका धावपटूच्या नावावर २५४ रुबिक क्यूब सोडवण्याचा विक्रम अाहे. येत्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये रंजित यांच्या कामगिरीची सर्वांनाच उत्सुकता अाहे.



४५० क्युब सोडवण्याचा प्रयत्न

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथाॅनमध्ये सहभागी होताना पाच ते साडेपाच तासांदरम्यान ४०० ते ४५० रुबिक क्यूब सोडवण्याचा रंजित विजयन यांचा प्रयत्न असेल. त्यांच्या सोबत यावेळी दोन धावपटू धावणार अाहेत, ते त्यांना रुबिक क्यूब देण्यासाठी मदत करतील.


गेल्या तीन वर्षांपासून मी मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये धावत अाहे. काही जण धावताना खांब किंवा झाडे मोजण्याचा प्रयत्न करतात पण मी रुबिक क्यूब सोडवत मॅरेथाॅन स्पर्धा पूर्ण करत असतो. मी गळ्याभोवती गो प्रो कॅमेरा लावणार असल्यामुळे माझा विक्रम या कॅमेऱ्यात कैद होत जाईल.
- रंजित विजयन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा