अायेशा मोहम्मदने जिंकली राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नरसोबावाडी येथे अायोजित करण्यात अालेल्या चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या अायेशा मोहम्मदने मुंबईच्याच काजल कुमारीचा पाडाव करत महिला एकेरीच्या गटात विजेतेपदाला गवसणी घातली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या थरारक लढतीत अायेशाने ३-२२, २४-९, २०-१५ असा विजय मिळवून विजेतेपद संपादन केले.

अशा रंगल्या उपांत्य लढती

उपांत्य लढतीतही मुंबईच्या चार कॅरमपटूंनी मजल मारली होती. काजलने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती तर अायेशाने मुंबईच्या संगीता चांदोरकर हिच्यावर विजय संपादन केला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत संगीता चांदोरकरने मैत्रेयी गोगटेवर १८-१७, २५-१० असा विजय मिळविला.

पुरुषांमध्ये विकास धारियाची अागेकूच

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्याच मोहम्मद गुफरानचा २५-२०, २१-१ असा सहज धुव्वा उडवला तर योगेश धोंगडेने हिदायत अन्सारीला २५-४, २५-० असे हरवले. ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या योगेश परदेशीवर ७-२१, २५-६, २५-२२ अशी मात केली. मुंबईच्या अमोल सावर्डेकरने गिरीश तांबेला १७-१८, २५-२१, २०-१९ असे हरवले.


हेही वाचा -

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले

राहुल द्रविडचा 'हाॅल अाॅफ फेम’मध्ये समावेश


पुढील बातमी
इतर बातम्या