Advertisement

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले

संघात निवड झाली असतानाही खेळाडूंना फक्त तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघाबाहेर जावे लागत अाहे, हे दुर्दैव अाहे. निवड समितीच्या या प्रक्रियेमुळे संघाचा समतोल बिघडत असून खेळाडूंच्या कारकीर्दीवर त्याचा नकारात्मक परिणाम होत अाहे, अशा शब्दांत संदीप पाटील यांनी निवड समितीवर अागपाखड केली.

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले
SHARES

यो-यो फिटनेस टेस्टवरून निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील चांगलेच भडकले असताना यावेळी त्यांनी निवड समितीच्या या भूमिकेवर ताशेरे अोढले अाहेत. संघात निवड झाली असतानाही खेळाडूंना फक्त तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघाबाहेर जावे लागत अाहे, हे दुर्दैव अाहे. निवड समितीच्या या प्रक्रियेमुळे संघाचा समतोल बिघडत असून खेळाडूंच्या कारकीर्दीवर त्याचा नकारात्मक परिणाम होत अाहे, अशा शब्दांत संदीप पाटील यांनी निवड समितीवर अागपाखड केली.


यो-यो टेस्टमुळे अखेरच्या क्षणी भारतीय संघात बदल करावे लागत अाहेत. मी फिटनेसच्या विरोधात नाही. पण संघात निवड झाल्यानंतरही यो-यो टेस्टमुळे एखाद्या खेळाडूला डच्चू मिळतो, हे मला विचित्र वाटते. यामुळे तुम्ही क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करत अाहात. अायपीएलदरम्यान एकाही खेळाडूला तंदुरुस्तीचा त्रास जाणवला नाही. अाता अचानक सर्व खेळाडू संघाबाहेर जात अाहेत. अाता ट्रेनरच निवड समितीचे सदस्य झाले अाहेत का?
- संदीप पाटील, माजी क्रिकेटपटू



निवड प्रक्रियेत हस्तक्षेप वाढला

निवड समिती सदस्यांव्यतिरिक्त अन्य जणांचाच निवड प्रक्रियेत सहभाग वाढल्याबाबत संदीप पाटील यांनी चिंता व्यक्त केली. याअाधी निवड समितीच्या प्रत्येक बैठकीअाधी, प्रत्येक सदस्य फिट अाणि अनफिट खेळाडूंची यादी द्यायचे. त्यानंतरच निवड समितीच्या बैठकीला सुरुवात व्हायची. बीसीसीअाय, कर्णधार किंवा प्रशिक्षक यापैकी कुणाचाही ह्स्तक्षेप नसायचा. पण अाता हा हस्तक्षेप वाढला, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

क्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील

कसोटी क्रिकेट हे आईच्या हातचं जेवण - बलविंदर सिंग संधू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा