Advertisement

क्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील


क्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील
SHARES

अायपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार अाहे. मात्र भारतीय क्रिकेटपटूंसाठी अनिवार्य असलेल्या यो-यो फिटनेस टेस्टमुळे अनेकांच्या 'विकेट' पडल्या अाहेत. यो-यो या तंदुरुस्ती चाचणीत फेल ठरल्यामुळे अंबाती रायडूची इंग्लंडवारी हुकणार अाहे. त्याचबरोबर संजू सॅमसन यालाही भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून डच्चू देण्यात अाला अाहे. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक अाणि क्रिकेटपटू संदीप यांना हे मान्य नाही.


'दोनदा संधी द्या'

भारतीय खेळाडूंनी तंदुरुस्ती राखायलाच हवी. पण तंदुरुस्ती हा अपरिहार्य घटक असला तरी खेळाडूंप्रति काही निष्ठा असायला हवी. जर कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंना अापलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे यो-यो फिटनेस टेस्ट पार करण्यासाठीही दोन वेळा संधी द्यायला हवी, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.


'रायडूबाबत जे घडलं ते अयोग्य'

जर एखादा खेळाडू यो-यो फिटनेस टेस्ट पार करण्यात अपयशी ठरला तर त्याला काही तासांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्याला दुसरी संधी द्यायला हवी. जर अंबाती रायडू कोणत्या कारणास्तव पुन्हा ही फिटनेस टेस्ट पार करण्यासाठी तयार नसेल तर त्याच्या कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उभं राहील. गेल्या वर्षभरात अंबाती रायडूनं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. पण अर्ध्या तासाच्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला हे चुकीचं अाहे, असंही ते म्हणाले.


हेही वाचा -

मुंबई क्रिकेटमध्येही सुरू होणार यो-यो टेस्ट?

अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा