Advertisement

कसोटी क्रिकेट हे आईच्या हातचं जेवण - बलविंदर सिंग संधू


कसोटी क्रिकेट हे आईच्या हातचं जेवण - बलविंदर सिंग संधू
SHARES

कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट असून त्यातच खेळाडूंचा खरा कस लागतो. कसोटी क्रिकेटमधील खेळ सदैव स्मरणात राहतो तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरी क्षणार्धात विसरली जाते. थोडक्यात सांगायचं झाल्यास, कसोटी क्रिकेट म्हणजे आपल्या आईच्या हातचं जेवण तर टी-२० म्हणजे वडापाव. आईच्या हातच्या जेवणाची चव आपल्या कायम स्मरणात राहते तर वडापाव खाल्ला की थोड्या वेळानं विसरला जातो, अशा मार्मिक शब्दांत भारताला १९८३ सालचा विश्वचषक जिंकून देणारे शिलेदार बलविंदर सिंग संधू यांनी क्रिकेटमधील फरक अधोरेखित केला.


माधव अापटेंचीही 'बॅटिंग'

एमअायजी क्लबवर रमेश राजदे यांच्या स्मरणार्थ होतकरू क्रिकेटपटूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात अाली. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कसोटीपटू माधव अापटे यांनीही जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले की, बिशनसिंग बेदी, ईरापल्ली प्रसन्ना अाणि भागवत चंद्रशेखर हे तिघेही महान फलंदाज होते. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटशी त्यांनी तात्काळ जुळवून घेतले असते. अाज ते जर टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असते तर त्यांनी अापली जादू नक्कीच दाखवली असती.


वेदांत गडिया, अमन तिवारीला शिष्यवृत्ती

१४ वर्षे वयोगटात वेदांत गडिया याला राजदे शिष्यावृत्तीने सन्मानित करण्यात आले. लेगस्पिनर अमन तिवारी यालाही माधव आपटे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. १६ वर्षाखालील गटात जबरदस्त कामगिरी करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज मुशीर खान तसेच बडोदा विरुद्ध नाबाद २१४ धावांची खेळी करणारा प्रग्णेश कानपिल्लेवार याला तर १९ वर्षे वयोगटात उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अंजदीप लाड यांना राजदे शिष्यवृत्तीने गौरविण्यात आले.


अंशुमन गायकवाडांचा सन्मान

अलीकडेच भारताचे माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांना बीसीसीअायने सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यामुळे या कार्यक्रमात अंशुमन गायकवाड यांनाही चांदीचे तबक देऊन विशेष सत्कार करण्यात अाला.


हेही वाचा -

मुंबईच्या सीअायसी कमिटीत करसन घावरी, बलविंदर संधू

क्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा