Advertisement

मुंबईच्या सीअायसी कमिटीत करसन घावरी, बलविंदर संधू


मुंबईच्या सीअायसी कमिटीत करसन घावरी, बलविंदर संधू
SHARES

मुंबई क्रिकेटमध्ये सध्या अालबेल सुरू अाहे. मुंबईच्या संघाची घसरती कामगिरी, प्रशिक्षक समीर दिघे यांनी दिलेला राजीनामा, सध्या होऊ घातलेल्या निवडणुका अाणि लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी एमसीएचा सुरू असलेला अाटापिटा, यामुळे मुंबई क्रिकेटला सध्या बुरे दिन अाले अाहेत. त्यातच क्रिकेट सुधार समितीच्या (सीअायसी) अध्यक्षपदाची जबाबदारी माजी क्रिकेटपटू अजित अागरकरने नाकारल्यामुळे अाता सीअायसीमध्ये करसन घावरी, बलविंदर सिंग संधू या भारताच्या माजी क्रिकेटपटूंसह मुंबईचा माजी सलामीवीर साहिल कुकरेजा याचा समावेश करण्यात येणार अाहे.


तिघांनीही स्वीकारली अाॅफर

सध्या मुंबई क्रिकेटसाठी चांगला प्रशिक्षक मिळविण्यासाठी एमसीएचा शोध सुरू असून या तिघांनीही सीअायसीच्या सदस्यपदाची अाॅफर स्वीकारल्याचे एमसीएचे सहसचिव उन्मेष खानविलकर यांनी स्पष्ट केले. संधू अाणि घावरी यांनी याअाधी मुंबईचं प्रशिक्षकपद, निवड समिती सदस्य, व्यवस्थापकीय समिती सदस्य अशा विविध भूमिका निभावल्या अाहेत. कुकुरेजा मात्र पहिल्यांदाच मुंबई क्रिकेटसाठी काम पाहत अाहे.


वाडेकरांनी अाॅफर नाकारली

सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) कारभार सांभाळणाऱ्या प्रशासकीय समितीने (सीअोए) भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यासमोर सीअायसीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र ७७ वर्षीय वाडेकर यांनी तब्येतीच्या कारणास्तव ही अाॅफर नाकारल्याचे समजते. सीअायसीचे सदस्य असलेले वाडेकर हे वर्षभरात एकाही बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. अाता करसन घावरी हे सर्वात जुनेजाणते क्रिकेटपटू असल्याने तेच सीअायसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता अाहे.


हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबई क्रिकेटमध्येही सुरू होणार यो-यो टेस्ट?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा