सुशांतच्या आत्महत्येनंतर गुगलवर डिप्रेशन शब्द अधिक सर्च

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. गेले सहा महिने तो नैराश्यात होता. त्यातूनच त्यानं आत्महत्या केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याच्या आत्महत्याचा सर्वांनाच धक्का बसला. पण आपल्या अनेकांना अद्यापही नैराश्य म्हणजे काय? हे माहित नाही. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली.

दरम्यान गुगलवर या घटनेनंतर डिप्रेशन म्हणजे काय? याची सर्वाधिक शोधाशोध सुरु झाली. नेटकऱ्यांनी मागील ४८ तासात ‘डिप्रेशन’ हा शब्द कोरोनापेक्षाही जास्त वेळा सर्च केला आहे. या देशातील केरळ, नागालँड, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये हा शब्द जास्त सर्च केला गेला. नेटकऱ्यांनी गुगलच्या माध्यमातून सुशांतच्या डिप्रेशनमागचं कारण, डिप्रेशनचा अर्थ काय? याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला.

आपण ज्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो, त्याचप्रकारे आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याकडेही आवर्जुन लक्ष दिले पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवर ही गोष्ट अधोरेखित करत देशात मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीला गेल्या काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे.


हेही वाचा

लॅपटॉप, टॅबच्या मागणीत प्रचंड वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या