Advertisement

लॅपटॉप, टॅबच्या मागणीत प्रचंड वाढ


लॅपटॉप, टॅबच्या मागणीत प्रचंड वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळांचे वर्ग ऑनलाइन भरविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. त्यामुळं पालकांकडून टॅब आणि सेकंड हॅन्ड मोबाईलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं अनेकांना खरेदीच्या प्रतीक्षेत रहावं लागत आहे. लॉकडाऊननंतर नोकरदार वर्ग घरातून फोन, लॅपटॉपच्या माध्यमातून काम करत आहे. यातच शाळाही ऑनलाइन सुरू होत असल्याने पालक टॅब आणि सेकंड हॅन्ड मोबाइल खरेदी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.

लॉकडाऊननंतर दुकानं खुली होऊ लागली असली, तरी पुरेसे साहित्य नसल्याने पालकांची मागणी पूर्ण करण्यात दुकानदारांना अडथळे येत आहेत. टॅब स्वस्त मिळत असल्यानं पालक मोबाईलऐवजी टॅबला पसंती देत आहेत. तसंच अनेकांकडं पैसे अधिक नसल्यानं ते सेकंडहॅन्ड स्मार्ट फोन खरेदी करत असल्याचं ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशननं स्पष्ट केलं.

ऑनलाइन शाळेबरोबरच अनेक खासगी कार्यालयांच्या बैठक ऑनलाइन होत आहेत. त्यामुळं देखील टॅबची मागणी वाढल्याची माहिती समोर येत आहे. लॅपटॉपला काही प्रमाणात मागणी आहे. मात्र तो खर्चिक असल्याने लॅपटॉप खरेदीला प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा