देसी Tiktok अॅप चिंगारी हॅक, कपंनी म्हणाली...

भारत सरकारकडून ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या यादीत शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅपच्या जागी आता इंडियन अॅप्स वेगानं प्रसिद्ध होत आहेत. यातील एक म्हणजे चिंगारी अॅप. आता या अॅप सोबत छेडछाड झाल्याचा आणि हॅकिंग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. चिंगारी अॅपला ऑपरेट करणारी कंपनी Globussoft ची वेबसाईटच्या कोड्समध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीच्या वेबसाईटच्या सर्व पेजेसमधील एक स्क्रीप्ट अॅड करण्यात आली आहे. ज्यात मॅलिशस कोडचा समावेश होता. याच्या मदतीनं युजर्सला वेगवेगळ्या वेबसाइट्सवर रिडायरेक्ट केलं जावू शकतं. Globussoft वेबसाइटची कमतरता सिक्योरिटी रिसर्चर एलियट एल्डरसननं माहिती काढली आहे. याआधी एलियटकडून आरोग्य सेतू अॅपच्या एका प्रायव्हसी संबंधी माहिती देण्यात आली होती.

युजर्सचा डेटा सुरक्षित

चिंगारी अॅपचे सह संस्थापक सुमित घोष यांनी याप्रकरणी बोलताना सांगितलं आहे की, Globussoft हा अॅपचा एक भाग असला तरी युजर्संना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू शकत नाही. या समस्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. चिंगारीला Globussoft सोबत तयार करण्यात आले आहे. तसंच हे आम्हीच बनवलं आहे. चिंगारी अॅप किंवा वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित आहे. याचा युजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.

टॉप चार्ट्समध्ये चिंगारी

अॅप फाउंडर सुमित घोष यांच्या माहितीनुसार, वेबसाइटवर सध्या जो इश्यू येत आहे. तो लवकर सॉल्व होईल. 'Globussoft वेबसाइट आणि चिंगारी अॅप दोन्ही सिक्योरिटी आणि इंजिनियरिंग टीम वेगवेगळी आहेत. चिंगारी लवकरच एक स्वतंत्र कंपनी बनणार आहे. लाँच होण्याआधी १५ दिवसात या अॅपला १० लाखांहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आलं आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर हे अॅप टॉप चार्ट्समध्ये पोहोचलं आहे.


हेही वाचा

जाणून घ्या What's App चे ५ धमाकेदार फिचर्स

पुढील बातमी
इतर बातम्या