Advertisement

जाणून घ्या What's App चे ५ धमाकेदार फिचर्स

What’s App युजर्ससाठी नवीन फिचर्स घेऊन आलं आहे.तुम्ही कशाप्रकारे त्याचा वापर करू शकता हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाणून घ्या What's App चे ५ धमाकेदार फिचर्स
SHARES

What’s App नेहमीच आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे फिचर्स आणत असतो. यावेळी देखील What’s App युजर्ससाठी नवीन फिचर्स घेऊन आलं आहे. त्यामध्ये अॅनिमेटेड स्टिकर्स, व्हॉट्सअॅप वेबसाठी डार्क मोड, क्यूआर कोड्स, KaiOS साठी स्टेट्सचा समावेश आहे. तुम्ही कशाप्रकारे त्याचा वापर करू शकता हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


१) व्हॉट्सअॅप अॅनिमेटेड स्टिकर्स

व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा वापर युजर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. नवीन स्टिकर्स रोल आऊट करण्यासासंबंधी व्हॉट्सअॅप कंपनीनं म्हटलं की, व्हॉट्सअॅप स्टिकर्स एक दुसऱ्याला कम्यूनिकेट करुन खूप प्रसिद्ध होत आहेत. सध्या जगभरात रोज अब्जो स्टिकर्स पाठवले जात आहेत. यावेळी आम्ही अॅनिमेटेड स्टिकर्स रोलआऊट करीत आहोत. कारण, यामुळे चॅटिंगची मजा आणखी मजेदार होईल.


२) QR कोड्स

स्टिकर्ससोबत व्हॉट्सअॅपनं QR कोड्स फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीनं युजर्स नवीन कॉन्टॅक्ट अॅड करणे अधिक सोपे होईल. आता युजर सेंडरला पाठवलेल्या क्यूआर कोडला स्कॅन आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जोडू शकतील.

३) वेब डार्क मोड

वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपनं आपल्या मोबाइल अॅपसाठी डार्क मोड लाँच केलं होतं. आता कंपनी डार्क मोडला वेब युजर्ससाठी आणलं आहे. व्हॉट्असअॅपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वापरता येईल. हे फीचर काही दिवसात सर्व युजर्संना वापरता येईल.


४) ग्रुप कॉलिंग

व्हॉट्सअॅपनं नुकतीच ग्रुप व्हिडिओ कॉल मेंबर्सची संख्या चारवरून आठ केली होती. आता कंपनीनं व्हिडिओ कॉलिंग फीचर आणखी चांगले बनवण्यसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युजर्स आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंग दरम्यान त्या युजर्सला फुल स्क्रीनवर पाहू शकेल. ज्यावर फोकस करायचा आहे. यासाठी युजरला त्या युजरच्या व्हिडिओल थोडे प्रेस करावे लागेल. त्यानंतर ते फुल स्क्रीनवर पाहता येईल.


५) KaisOS स्टेट्स अपडेट फीचर

कंपनीनं KaisOS युजर्ससाठी एक स्टेट्स उपलब्ध करून दिले आहे. आता KaisOS युजर अँड्रॉयड आणि iOS युजर्सला स्टेट्स अपडेट करू शकतील. हे स्टेट्स २४ तासांनंतर डिलीट होईल.हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement