आलं, गुगलचं 'मोबाईल वाॅलेट' अॅप

भारतात मोबाईल वाॅलेटचा वाढता बाजार पाहून आता गुगलनेही 'तेज' नावानं ई-वाॅलेट अॅप लाॅन्च केलं आहे. गुगलच्या या आॅनलाईन पेमेंट सेवेला सोमवारपासून सुरूवात झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते दिल्लीत हे अॅप लाॅन्च करण्यात आलं.

या अॅपला 'युनिफाईड पेमेंट इंटरफेस' (यूपीआय) सोबत जोडण्यासाठी गुगलनं 'पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडिया' (एनपीसीएल) सोबत करार केला आहे. या अॅपद्वारे पैशांच्या घेवाण-देवाणीसोबतच दुकानांत पेमेंटही करता येऊ शकतं. 'यूपीआय' यंत्रणेवर काम करणारं 'तेज' हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करता येऊ शकतं.

'तेज'मध्ये खास काय?

'तेज'मधून तुम्ही कुठल्याही अकाऊंटमध्ये पैसे पाठवू शकता किंवा कुठल्याही बँकेतून तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ शकतात. अट एवढीच की समोरची बँकही 'यूपीआय' यंत्रणेवर चालणारी असावी.

या अॅपच्या वापरासाठी वेगळा आयडी बनवण्याची गरज नाही. गुगल आयडीवरूनही या अॅपवर तुम्हाला 'लाॅग इन' करता येईल.

व्हाॅट्सअॅपही उतरणार मैदानात

भारतासारख्या अवाढव्य बाजारपेठेकडे लक्ष केंद्रीत करून सोशल मेसेजिंग अॅप व्हाॅट्सअॅपनंही 'यूपीआय' यंत्रणेवर चालणारं वाॅलेट अॅप बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर त्यावर काम सुरू आहे.

हे अॅपदेखील देतात 'पेमेंट' सेवा

गुगल 'तेज' अगोदरही भारतीय बाजारात 'यूपीआय' यंत्रणेवर चालणारे मोबाईल वाॅलेट अॅप लाॅन्च झाले आहेत. त्यात मेसेंजर, मोबिक्वीक, फ्रिचार्ज, साइट्रस, आॅक्सिजन, पे टीएम, जियो मनी, पे यू, फोन पे, इट्जकॅश, ओला मनी, द मोबाईल बँक इ. अॅपचा समावेश आहे. 


हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? नसेल तर असं करा...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या