Advertisement

पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? नसेल तर असं करा...


पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? नसेल तर असं करा...
SHARES

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याला ४ महिन्यांची (३१ डिसेंबरपर्यंत) मुदतवाढ दिलीय. तरीही तुम्ही अजूनपर्यंत तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलं नसेल, तर पटकन करून टाका. तसं केलं नाही तर ३१ डिसेंबरनंतर तुमचं पॅन कार्ड बाद होऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला थेट दुसरं पॅन कार्ड काढावं लागेल.  


रिटर्न मिळणार नाही

तुम्ही भलेही ऑनलाईन प्राप्तिकर भरला असेल, अधिक प्राप्तिकर जमा केला असेल, तुमचा टीडीएस पगारातून कापून गेला असेल किंवा तुम्ही प्राप्तिकर परताव्या (इन्कम टॅक्स रिटर्न) अंतर्गत ‘रिफंड’साठी अर्ज केलेला असेल, तरीही तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करावंच लागेल. नाहीतर तुमची रिटर्न फाईलची प्रक्रिया पुढे जाणार नाही आणि तुमच्या खात्यात रिफंड जमाच होणार नाही. प्राप्तिकर विभागाने ही बाब अगोदरच स्पष्ट केलीय.



पगारही अडकू शकतो

बँकेत खातं उघडायचं असो किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार करायचे असोत, त्यासाठी पॅन कार्ड हे लागतंच. हे पॅन कार्ड जर बाद झालं, तर आपले आर्थिक व्यवहार खोळंबू शकतात. प्राप्तिकर मर्यादेनुसार कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापून उर्वरीत पगार बँकेत जमा करतात. तुमचा पॅन कार्ड क्रमांक बाद झाला, तर कंपन्यांना टीडीएस कापून पगार बँकेत टाकता येणार नाही. त्यामुळं तुमचा पगारही अडकू शकतो.


असं करा लिंक

तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करा. त्यावर UIDPAN लिहून स्पेस द्या. नंतर तुमचा आधार नंबर टाकून स्पेस द्या आणि पॅन कार्ड नंबर टाकून वरील दोन्ही नंबर पैकी एका नंबरवर 'एसएमएस' करा.

याचबरोबर प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला आधार लिंक करता येईल. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. डाव्या हाताला आधार लिंक असा एक पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. समोर आलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी आपोआप लिंक होईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा