आता इन्स्टावर शेअर करा एकावेळी सहा फोटो

इन्स्टाग्राम अॅपवर आता एकाचवेळी सहा फोटो शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्रामवर एक नवे फिचर युजर्ससाठी लाँच करण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम मॉसरी यांनी ट्विटरवरून या नव्या फिचरची अधिकृत घोषणा केली आहे. या आठवड्याच्या अखेरीस इन्स्टा युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होईल.

'हे' आहे नाव

कंपनीनं या नव्या फिचरला ले-आऊट फिचर असं नाव दिलं आहे. नवे फिचर वापरून इन्स्टाग्राम युजर्स एकाचवेळी अनेक फोटो ग्रीड फॉरमॅटच्या माध्यमातून शेअर करू शकता. मात्र, या फॉरमॅटच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहा फोटो शेअर केले जाऊ शकतात. कंपनीच्या सीईओंनी आपल्या ट्विटर हँडलवरून ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले फोटो शेअर केले आहेत.

कसे वापराल हे फीचर?

मोबाइलमधील गॅलरीमध्ये सेव्ह केलेली छायाचित्रांचा वापर करून फोटो ग्रीड फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. अन्यथा इन्स्टाग्राम युजर्सना इन्स्टा कॅमेराचा वापर करूनही ग्रीड फॉरमॅटमध्ये फोटो तयार करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

आत्तापर्यंत एकापेक्षा जास्त फोटो शेअर करण्यासाठी इन्स्टा यूजर्सना थर्ड पार्टी अॅप वापरावं लागत होतं. एकाचवेळी अनेक फोटो अपलोड करण्याची सुविधा इन्स्टाग्रामवर उपलब्ध नव्हती. युजर्सची आवड आणि गरज लक्षात घेता इन्स्टा कंपनी या नव्या फिचरवर काम करत होती. अखेर फोटो ग्रीड फॉरमॅटचे फिचर कंपनीनं युजर्ससाठी खुलं केलं आहे.


हेही वाचा

व्हॉट्स अॅपचे ३ नवीन फीचर लाँच

पासवर्ड हॅक झाल्यास गुगल देणार अलर्ट

पुढील बातमी
इतर बातम्या