Advertisement

पासवर्ड हॅक झाल्यास गुगल देणार अलर्ट

युजर्सचा पासवर्ड आता हॅक झाल्यास क्रोम ब्राउजर त्याबाबत अलर्टची सुचना देणार आहे.

पासवर्ड हॅक झाल्यास गुगल देणार अलर्ट
SHARES

युजर्सचा डेटा चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी गुगलकडूनही काही ना काही प्रयत्न केले जातात. त्यानुसार युजर्सचा पासवर्ड आता हॅक झाल्यास क्रोम ब्राउजर त्याबाबत अलर्टची सुचना देणार आहे. गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करत याची अधिक माहिती दिली आहे.

कसं करणार अलर्ट?

सुंचर पिचाई यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड कॉम्प्रोमाइज्ड आणि तुम्ही कोणत्याही एखाद्या वेबसाईटवर गेल्यास तुम्हाला गुगल क्रोम अलर्ट करणार आहे. हे नवे फिचर युजर्सच्या सेफ्टीसाठी असणार आहे. तसंच रियल टाइम फिशिंग प्रोटेक्शन मध्ये सुद्धा सुधारणा केली जात आहे.


कसा अॅक्टिव्ह कराल प्लॅन?

क्रोम सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला सिंक ऑप्शन सिलेक्ट करावं लागेलहे ऑप्शन सध्या फक्त ज्यांनी क्रोमच्या सेफ ब्राउजिंग प्रोटेक्शन अंतर्गत साइन इन केलं आहे त्यांच्यासाठीच आहेगुगलनं या टेक्नॉलजीनं सर्वात प्रथम पासवर्ड चेकअप एक्सटेंशनच्या रुपात लॉन्च केलं होतंया फिचरचा विस्तार करत कंपनीनं याला गुगल क्रोमच्या पासवर्ड प्रोटेक्शनसाठी सुद्धा लागू केलातसंच अनसेफ पद्धतीची वेबसाईट गुगलकडून प्रत्येक ३० मिनिटानंतर रिफ्रेश करण्यात येते.



हेही वाचा

२०१९ मध्ये भारतीयांनी गुगलवर 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

'या' आयफोन आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा