Advertisement

'या' आयफोन आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

फेसबुकचं स्वामित्व असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार 'या' तारखेपासून बंद होणार काही स्मार्टफोन आणि आयफोनवर व्हॉट्सअॅप बंद...

'या' आयफोन आणि स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद
SHARES

व्हॉट्सअॅप यूजरसाठी एक वाईट बातमी आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून यूजरच्या पसंतीचं हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप लाखो मोबाइलवर दिसणार नाही. फेसबुकचं स्वामित्व असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. काही स्मार्टफोनमध्ये १ फेब्रुवारी २०२० नंतर व्हॉट्सअॅप अॅक्सेस होऊ शकत नाही, असं त्यात म्हटलं आहे.

यूजरच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअॅपच्या या निर्णयानंतर अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या लाखो स्मार्टफोन यूजरना व्हॉट्सअॅप वापर करता येणार नाही.


'या' आयफोनवर वापरता येणार नाही

व्हॉट्सअॅप फेब्रुवारी २०२० पासून आयओएस ८ आणि त्याआधीच्या व्हर्जनच्या आयफोनवर वापरता येणार नाही. याचाच अर्थ ज्या यूजरकडे आयफोन ६ किंवा त्याआधीचे आयफोन आहेत, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. 'व्हॉट्सअॅपच्या सर्वोत्तम अनुभवासाठी आम्ही यूजरना त्यांच्या आयफोनसाठी उपलब्ध असलेल्या आयओएसचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देत आहोत,' असं कंपनीनं त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

'या' स्मार्टफोनवर वापरता येणार नाही


अँड्रॉइडच्या २..३ व्हर्जनपेक्षा जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. अँड्रॉइड जिंजरब्रेड २०१० मध्ये लाँच झाला होता. जवळपास १० वर्षांपूर्वी लाँच झालेल्या हुवावे, सॅमसंग, सोनी आणि गुगलचे स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजरना व्हॉट्सअॅप बंद होण्याची चिंता नाही.



हेही वाचा

पीआयबी करणार व्हॉट्सअपवरील सरकारी माहितीची शहानिशा

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा 'USB कंडोम'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा