डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा 'USB कंडोम'

सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सवरून मोबाईल चार्ज करणं हे धोकादायक ठरू शकतं. हा धोका टाळण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे यूएसबी कंडोम नावाच्या डिव्हाइसचा.

SHARE

आपण काही कामानिमित्त ऑफिसच्या किंवा घराच्या बाहेर असू आणि मोबाईलची बॅटरी संपणार असेल तर? काय करावं आणि काय नाही अशा चिंतेत तुम्ही असता. कसा बसा तुम्हाला एक पर्याय मिळतो तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असणारे चार्जिंग पॉईंट. पण अशा चार्जिंग पॉईंट्सवरून मोबाईल चार्ज करणं हे धोकादायक ठरू शकतं. हा धोका टाळण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे यूएसबी कंडोम नावाच्या डिव्हाइसचा.

डेटा सुरक्षित राहिल

आजकाल सार्वजनिक ठिकाणी कॉमन युएसबी पोर्ट किंवा चार्जिंग वापरले जाते. अशावेळी युएसबी कंडोमचा वापर उपयुक्त ठरतो. हे एक असं डीव्हाईस आहे ज्यामुळे कोणताही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून डेटा ट्रान्सफर होण्यापासून रोखतो. यामुळे फक्त चार्जिगसाठी इलेक्ट्रीसिटी पास होते आणि डेटा ट्रान्सफर होत नाही.


'असा' चोरला जातो डेटा

युएसबी चार्जिंग स्कॅमचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे युएसबी कंडोम गरजेचं बनलं आहे. याचा वापर करून डेटा सुरक्षित ठेवता येतो. हॅकर्स पब्लिक चार्जिंगच्या मदतीनं युजर्सना टार्गेट करतात. यातून डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले जातात. युजर्स जेव्हा पब्लिक चार्जिंग स्टेशनचा वापर करतात तेव्हा फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतात आणि पर्सनल डेटा आणि पासवर्ड चोरी केलं जातं. अशा वेळी डेटा ब्लॉकर म्हणजेच युएसबी कंडोम तुमच्याकडे असेल तर केबल किंवा चार्जिंग स्पेस वापरताना डेटा सुरक्षित राहिल.हेही वाचा

व्होडाफोन-आयडीया, जिओ, एअरटेलनं केली 'इतकी’ शुल्कवाढ

आता फेसबुकवरून फोटो व्हिडिओ ट्रान्स्फर करा

संबंधित विषय
ताज्या बातम्या