Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

व्होडाफोन-आयडीया, जिओ, एअरटेलनं केली 'इतकी’ शुल्कवाढ

सध्या दुरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी शर्यत रंगली आहे.

व्होडाफोन-आयडीया, जिओ, एअरटेलनं केली 'इतकी’ शुल्कवाढ
SHARES

सध्या दुरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी शर्यत रंगली आहे. तसंच, अनेक कंपन्या आपल्या सेवांच्या शुल्कात वाढ करत आहेत. व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’नं शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतकरण्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नं देखील शुल्कात वाढ केली आहे.

४० टक्के दरवाढ

सध्या मुंबईतील ग्राहकांचं लोकप्रिय असलेल्या ‘रिलायन्स जियो’च्या सेवेच्या शुल्कातही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढी होणार आहे. याबाबत कंपनीनं घोषणा केली असून, यामुळं मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेनं कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत.

एअरटेल

  • प्रतिदिन ५० पैसे ते २.८५ रुपये दरवाढ.
  • डेटा आणि कॉलिंगचे भरघोस फायदे देण्याचा दावा.
  • निश्चित कॉलमर्यादा ओलांडल्यास प्रतिमिनीट ६ पैसे.

जिओ

  • ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्क्यांपर्यंत दरवाढ.
  • नव्या प्लॅन्समधून ग्राहकांना ३०० टक्के अधिक लाभ देण्याचा दावा.
  • ऑल इन वन प्लॅन्स मध्ये अमर्याद संभाषण आणि इंटरनेट वापराचा दावा.

व्होडाफोन-आयडिया

  • अन्य कंपन्यांच्या मोबाइलवर केलेल्या कॉलसाठी प्रतिमिनीट ६ पैसे
  • दरवाढीमुळे १,६९९ रुपयांचा अमर्याद वार्षिक प्लॅन २,३९९ रुपयांवर
  • प्रतिदिन १.५ जीबी डेटा वापराचा अमर्याद प्लॅन १९९ वरून २४९ रुपयांवर.हेही वाचा -

मुंबईत 'इतके' दिवस १० टक्के पाणीकपात

सत्ता गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवलाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा