Advertisement

सत्ता गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवला

शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे नवीन सरकार विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करणार असल्याने महाराष्ट्रात हे सत्तानाट्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ता गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवला
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्थापनेवरून अनेक खलबतं झाली. त्यात अवघ्या साडेतीन दिवसांसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले, मात्र त्या मागे फडणवीसांची काय खेळी होती, ते भाजपचे खासदार अनंत हेडगे यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. “फडणवीसांचे सरकार महाराष्ट्रात बनत नसल्यामुळे त्यांनी केंद्रातून आलेली ४० हजार कोटींची मदत शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी विकासाच्या नावाखाली निधीचा गैरवापर करतील म्हणून हे सत्तानाट्य केल्याचे हेगडे यांनी उपस्थितांना सांगितले.

 केंद्राचा ४० हजार कोटींची निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्याचे खळबळजनक विधान भाजपचे खासदार अनंत हेडगे यांनी केले आहे. शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे नवीन सरकार विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करणार असल्याने महाराष्ट्रात हे सत्तानाट्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्तानाट्य हे पूर्वनियोजीत असल्याचे हेडगे म्हणाले. सत्तास्थापनेसाठी बहुमत नसल्याचे माहिती असतानाही आम्ही सरकार स्थापन केले. कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित केंद्राचा जवळपास ४० हजार कोटींचा निधी असल्याची माहिती हेडगे यांनी दिली. शिवसेना सत्तेत आली असती, तर विकासाच्या नावाखाली त्यांनी या पैशाचा गैरवापर केला असता, असे ते म्हणाले. यासाठी भाजपने सत्ता स्थापन करुन खबरदारी घेतल्याचे सांगत त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. हेडगे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचाः- काँग्रेसचे नाना पटोले बनले विधानसभा अध्यक्ष

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा