Advertisement

काँग्रेसचे नाना पटोले बनले विधानसभा अध्यक्ष


काँग्रेसचे नाना पटोले बनले विधानसभा अध्यक्ष
SHARES

विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा यश मिळालं आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी काँग्रेसचे विदर्भातील आमदार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

भाजपने पटोले यांच्या विरोधात किशन कथोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भापकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने या लढतीत कथोरे यांचा पराभव झाला असता. याआधीच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन नामुष्की टाळली.

राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीने दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात शनिवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 169 विरुद्ध 0 अशा फरकाने जिंकला.

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतल्याने हे मंत्रिमंडळ तसंच बोलवलेलं विशेष अधिवेशन घटनाबाह्य असल्याचा आरोप भाजपने केला. तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला सुरुवात होताच सभात्याग करत भाजपचे सर्व आमदार सभागृहाबाहेर पडले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा